नवी मुंबईतील नागरी समस्या सोडवण्या संदर्भात विजय नाहटा यांनी घेतली आयुक्त अभिजित बांगर यांची भेट
नवी मुंबईतील नागरी समस्या सोडवण्या संदर्भात विजय नाहटा यांनी घेतली आयुक्त अभिजित बांगर यांची भेट.
KTG समाचार नवी मुंबई
नवी मुंबईच्या विविध भागांतील नागरी समस्या सोडवण्या संदर्भात शिवसेना उपनेते, पर्यावरण समाघात प्राधिकरण महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती ( राज्यमंत्री दर्जा ) विजय नाहटा यांनी नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची नुकतीच भेट घेतली. भेटीदरम्यान नवी मुंबई महानगर पालिका परिवहन सेवेतील ठोक मानधना वरील तसेच रोजंदारी वरील वाहक आणि चालक यांना परिवहन सेवेत कायम करण्याची मागणी केली .तसेच नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील शिक्षकांच्या वेतन वाढी संदर्भातील समस्या , इ.टी.सी. केंद्रातील करार पद्धतीवरील थेरपिस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी बाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.त्याच प्रमाणे एम.पी.डब्लू. कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या समस्या सोडण्या बाबत चर्चा करण्यात आली. तुर्भे नाका हनुमान नगर येथील असणाऱ्या नागरिकांच्या समस्या बाबत आयुक्तांना निवेदन देण्यात आले पावसाळी कामे लवकरात लवकर करण्यात यावीत तसेच सानपाडा नेरुळ या ठिकाणच्या नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे तेथील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी पाण्याचे प्रेशर वाढविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली वरील सर्व मागण्या संदर्भात चर्चा करून आयुक्त अभिजीत बांगर यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जिल्हा प्रमुख व्दारकानाथ भोईर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील,मिलिंद सूर्यराव, रोहिदास पाटील , शहर प्रमुख विजय माने,प्रवीण म्हात्रे,
माजी नगरसेवक रंगनाथ औटी, ज्ञानेश्वर सुतार, काशिनाथ पवार, रतन मांडवे, दिलीप घोडेकर, सरोजताई पाटील, मनोज हळदणकर, राजू पाटील, राजू कांबळे, बहादूर बिस्ट, रामआशिष यादव, चेतन नाईक, आकाश मडवी, सुरेश भिलारे तसेच शिवसेनेचे उपशहर प्रमुख विभाग प्रमुख,शाखा प्रमुख,युवा सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते